देवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास

सोलापूर (प्रतिनिधी) – रूपाभवानी मंदिरात दर्शन घेताना बॅगेत ठेवलेले आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मीनाक्षी वाकळे (रा. लातूर, हल्ली दर्गनहळ्ळी ता. दक्षिण सोलापूर) यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकडे या मूळ गावी यात्रा असल्याने लातूरहून तुळजापूर नाका येथे बसने उतरल्या. त्यांना घेण्यासाठी नातेवाईक आले होते. दर्शन घेऊन दुचाकीवरून गावी जात होते. काही अंतरावर गेल्यावर भावाजवळील पिशवी ब्लेडने कापल्याचे दिसले. शंका आल्यानंतर पिशवी उघडून पाहिली, पण त्यामध्ये दागिने नसल्याचे दिसून आले. चार तोळे वजनाच्या पाटल्या, तीन तोळ्याचे गंठन, एक तोळ्याचे लॉकेट व 1 तोळ्याचे कर्णफुले असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.