कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश

मुंबई – मुंबईतील कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी अखेजर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. दक्षिण-मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक केल्याने पक्षाने मला बाहेर केले, असे म्हणत कालिदास कोळंबकरांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली.
कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वीच कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर कॉंग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील कॉंग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये कोळंबकरांच्या रुपाने आणखी एकाची भर पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.