म्हसवड (प्रतिनिधी) – बनगरवाडी, ता. माण येथील शिंगाडेचे शेत नावाच्या शिवारात गांजाची बेकायदेशीर जोपासना केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाईत सात लाख 81 हजार 750 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माण तालुक्यातील बनगरवाडी येथे शिंगाडेचे शेत नावाच्या शिवारात गांजा पिकवला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील, सपोनि आनंदसिग साबळे, म्हसवडचे सपोनि गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, अर्जुन शिरतोडे, रवी वाघमारे, अजित कर्णे, संजय जाधव, पंकज बेसके, प्रयोगशाळा सहाय्यक ए. व्ही. कोळी, खटावकर, संतोष माळी, मोहन नाचण, पिंजारी, म्हसवड पोलीस ठाण्याचे काळे, वाघमोडे, काकडे यांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी तीन जण गांजाची पाने तोडताना सापडले. त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.