शिंदे वासुली -चाकण औद्योगिक वसाहतीतील सावरदरी येथील बड्या उद्योजकाची पिंपरी-चिंचवड येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि. 3) केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल शनिवारी (दि. 4) रात्री उशीरा निगेटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या खेळामुळे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी केलेल्या तपासणीचा अहवाल वेगवेगळा आल्याने संबंधित उद्योजक, गावकरी, नातलग व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांयध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या उद्योजकाने स्वत: व इतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 28 दिवस होमक्वारंटाइन होऊन प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे वराळेचे डॉ. हरिदास टेकवडे यांनी सांगितले.