खालापूर – मंत्री सुनिल तटकरे यांनी त्यांचे मामाचे छोटेशे गाव असलेल्या सावरोली येथील शाळेला अनुदान आणि परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज ६० टक्के अनुदान मिळत आहे. असे माहिती केटीएसपी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी दिली.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरोली माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंम्मेलन नुकतेच संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री पाटील बोलत होते. याप्रसंगी सरपंच संतोष बैलमारे, टाटा स्टील कंपनीचे वेंकटेश बिनविले, कुंभिवलीचे सरपंच रेखा वीर, संस्थेचे उपाध्यक्ष अबूशेठ जळगांवकर, संचालक दिलीप पोरवाल, नरेंद्र शाह, शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे, सह्याद्री स्कुल मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर, ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे, उज्वला घोसाळकर, ममता घोसाळकर, शुभम केलंजे व रंजना पाटील, पत्रकार प्रशांत गोपाळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत केदारी, एम.डी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वर्षभर क्रिडा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
श्री पाटील पुढे म्हणाले की, शिक्षकांचे वय वाढत जातं, त्यांचा शैक्षणिक आवधी पुढे सरकत जात असताना अनुदानाचा फायदा झाला पाहिजे. यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो मात्र सरकारच्या जाचक आटी, धोरणापुढे काहीही करता येत नाही. परंतु शिक्षकांनी प्रतिकुल काळात शाळा टिकविण्यासाठी विद्यार्थी जमा करीत शाळा चालू ठेवल्यामुळेच ६० टक्के अनुदानापर्यंत पोहचलो.