पुणे – सरकारकडून खुल्या बाजारात होत असलेली विक्री तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश येथून नव्या गव्हाची आवक वाढल्यामुळे गेल्या आठवड्यातही गव्हाच्या भावात क्विंटलमागे 200 ते 400 रुपयांनी घसरण झाली. येथील बाजारात दररोज दहा ते बारा ट्रक नव्या गव्हाची आवक होत आहे. मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेल, सरकी, सूर्यफूल तसेच सोयाबीन तेलाच्या दरात 15 किलोमागे 30 ते 40 रुपयांनी घसरण झाली.
मात्र पामतेल आणि वनस्पती तुपाच्या दरात 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली. नवीन आवक सुरू झाल्यामुळे सेलम आणि गावरान मटकी दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांनी घसरण झाली. मात्र आवक कमी असून मागणी चांगली असल्यामुळे तूरडाळीचे दर क्विंटलमागे आणखी 500 रुपयांनी तर हरभराडाळीचे दर 100 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. मागणी अभावी गोटा खोबरे दरात दहा किलोमागे आणखी दीडशे रुपयांनी घसरण झाली. शेंगदाण्याचे दरही क्विंटलमागे तीनशे रुपयांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले.
सध्या कोणतेही सण-उत्सव नसल्यामुळे गुळास मागणी कमी आहे. यामुळे दर स्थिर होते. मात्र आगामी काळात सण-उत्सवांना प्रारंभ होत असल्यामुळे गुळास मागणी वाढणार आहे. मात्र सध्या उसाचा तुटवडा जाणवत असून गुळाचे उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्याभरातच सेलम मटक. दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांनी घट झाली. यामुळे गावरान मटकी दरातही 800 ते 1000 रुपयांनी घट झाली. अन्य कडधान्यांचे दर स्थिर होते. मात्र उत्पादन केंद्रातील तेजीच्या वृत्तामुळे तुरडाळीची सातत्याने दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही दर आणखी 500 रुपयांनी वाढले.
यंदा उत्पादन कमी असल्यामुळे तूरडाळीचे दर तेजीतच राहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी होळीच्या सणानिमित्त हरभराडाळीस मागणी चांगली असून गेल्या आठवड्यातही हरभराडाळ क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी महागल्याचे सांगण्यात आले.
घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल)3475-3500 रु.
खाद्यतेले (15 किलो/लिटर) :
शेंगदाणा तेल2674-2775
रिफाईंड तेल2475-3325
सरकी तेल1650-2000
सोयाबीन तेल1770-1930
पामतेल1500-1750
सूर्यफूल रिफाईंड तेल1700-1850
वनस्पती तूप1475-1925
खोबरेल तेल2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा3200-3500
मसुरी3000-3300
सोनामसुरी4000-4400
एच. एम. टी. कोलम4500-5000
लचकारी कोलम5500-6000
चिन्नोर4500-5000, 1121-10000-11000
आंबेमोहोर (सुवासिक)7000-8000
बासमती अखंड11500-12000
बासमती दुबार8500-9000
बासमती तिबार9500-10000
बासमती मोगरा4500-5000
बासमती कणी3200-3500, 1509-8000-8500
इंद्रायणी4500-5000 रु.
गहू – सौराष्ट्री लोकवन नं. 13800
सौराष्ट्र0 लोकवन नं. 23300-3600
एम.पी. लोकवन3200-3400
सिहोर नं. 15000-5200
सिहोर नं. 24200-4500
सिहोरी3400-3600
मिलबर2500-2600 रु.
ज्वारी : गावरान नं. 15300-5500
गावरान नं. 24700-5000
नं. 34300-4500
दूरी3500-4000 रु.
बाजरी : महिको3200-3800
गावरान3200-3500
हायब्रीड3000-3200 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा3700-3950
गूळ नं. 13550-3650
गूळ नं. 23400-3550
गूळ नं.33250-3350
गूळ नं. 43100-3200
बॉक्स पॅकिंग3400-4600 रु.
डाळी : तूरडाळ9500-11400
हरभराडाळ5900-6100
मूगडाळ9500-9800
मसूरडाळ7300-7400
मटकीडाळ9900-10000
उडीदडाळ9000-10200 रु.
कडधान्ये : हरभरा5400-5500
हुलगा7500-8000
चवळी7500-8500
मसूर6600-6700
मूग8800-9000
मटकी गावरान10500-11500
मटकी पॉलिश7500-8000
मटकी गुजरात8000
मटकी राजस्थान8000
मटकी सेलम13000-13500
वाटाणा हिरवा5800-6000
वाटाणा पांढरा6500-6600
काबुली चणा12000-15000 रु.
साबुदाणा : साबुदाणा नं.16500
साबुदाणा नं.26200
साबुदाणा नं. 36000 रु.
वरई भगर :11000-12000
सावा भगर10000-11000
गोटा खोबरे1200-1400 रु.
शेंगदाणा : जाडा12000-12500
स्पॅनिश12200-12300
घुंगरु11500
टीजे10500-10600 रु.
धने : गावरान 12000-13000
इंदूर14000-17000 रु.
मका लाल2475-2550
पिवळा लाल2475-2550
पांढरा3200-3300 रु.
पोहे : मध्य प्रदेश 4000-4400
पेण4000-4300
मध्यम पोहा3800-4300
दगडी पोहा3800-4400
पातळ पोहा4400-5200
सुपर पोहा4400-4700
भाजका पोहा600-650
मका पोहा625-675
भाजके डाळे2800-3200
मुरमुरा (9 किलोस)475-525
भडंग650-775
घोटी450-475
सुरती475-500 रु.
रवा, मैदा, आटा – (50 किलोचा भाव) आटा1600-1675
रवा1600-1675
मैदा1600-1675
बेसन : (50 किलोस)3300-3600 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस)260
मीठ दळलेले (50 किलोस)260 रु.
मिरची : काश्मीरी ढब्बी45000-47000
ब्याडगी35000-37000
लवंगी तेजा23000-25000
गुंटूर25000-27000.