नवी दिल्ली -बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली त्याची अभिनेत्री मैत्रीण रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. तिला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
#SushantSinghRajput death case: Rhea Chakraborty arrives at Enforcement Directorate (ED) office in Mumbai.
ED rejected her earlier request that the recording of her statement be postponed till Supreme Court hearing. pic.twitter.com/MIWYlYMXhT
— ANI (@ANI) August 7, 2020
त्यासाठी रियाला आज 7 ऑगस्टला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यातच सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. रियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणी तिची चौकशी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे. सतीश मानशिंदे यांनी सांगितलं आहे की,’सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केली आहे.