पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री असणारे त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना ईडीने नव्याने समन्स बजावले आहे. लालूंना २९ जानेवारीला, तर तेजस्वी यांना ३० जानेवारीला चौकशीसाठी ईडीच्या पाटण्यातील कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
लालू रेल्वे मंत्री असताना रेल्वेशी संबंधित नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा घडल्याचा आरोप आहे. त्या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून लालू आणि तेजस्वी यांची चौकशी करण्यास ईडी उत्सुक आहे.
याआधीही त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्या पिता-पुत्रांनी चौकशीस हजर राहण्याचे टाळले. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे.