भोर, (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या भोर तालुका युवा वॉरियर्सचे अध्यक्ष रोहन भोसले, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष समीर घोडेकर व पुणे जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस पंकज खुर्द यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना लवकरात लवकर धुळीचा त्रास कमी होण्याकरता व कामाचा दर्जा उंचावण्याकरता निवेदन दिले आहे.
भोर तालुक्यातील सर्वात जास्त वाहतूक असलेल्या कापूरहोळ भोर ते मांढरदेवी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर दररोज कामा निमित्त पुण्याला जाणार्या नागरिकांना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे.
याकडे लक्ष वेधत भारतीय जनता पक्ष कडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तातडीने नागरिकांना चांगला रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होताना धुळीमुळे होणार्या त्रासाचा व त्यावर उपाययोजना करण्याच्या गोष्टींचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यास पंधरा दिवसात सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भाजप तर्फे देण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय वाघज यांनी पंधरा दिवसात धुळीपासून होणारा त्रास व पाण्याचा योग्य वापर करून काम उत्तम दर्जाचे होईल याकडे लक्ष देऊन उत्तम दर्जाचा रस्ता होण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासित केले.