Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभेला शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट संघर्ष असणार आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे.
महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरला असून महायुतीच्या सर्व पक्षांची मला साथ आहे.
या मुळे माझा विजय होउ शकतो असा असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अर्ज भरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. अशी माहिती समोर येत आहे की, सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणाने बाद झाला तर पर्याय म्हणून हा अर्ज भरण्यात आला आहे.