घराला घरपण देणारे डीएसके भाड्याच्या घरात

11 लाख रुपये भाडे देण्याची तयारी

मुंबई (प्रतिनिधी) – घराला घरपण मिळवून देणारी माणस अशी जाहिरात करून कोट्यवधी रुपये किमतीची घरे बांधणाऱ्या डीएसकेंना स्वत:च्या घरात भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंचा पुण्यातील बंगला ईडीने जप्त केल्याने या बंगल्यात राहण्यासाठी सुमारे 11लाख रुपये भाडे देण्याची तयारी त्यांनी दाखविली.

दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांना हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याने अटक करण्यात आली. ईडीने डीएसकेचे पुण्यातील डीएसके व्हिला येथील 11 कोटी रुपये किंमतीचा 355 चौमीचा बंगला जप्त केला. हा बंगला भाड्याने मिळावा म्हणून ईडीकडे मागणी केली. ईडीने बाजारभावाने सुमारे 11 लाख रुपये भाडे आकारले.

याबाबत सत्र न्यायालयाने डीएसकेंना 10 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. ही मुदत 25 सप्टेंबर रोजी संपल्याने ईडीने बंगला ताब्यात घेतला. त्या विरोधात डीएसकेनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी अपील दाखल करत तीन लाख रुपये दरमहा भाडे भरण्याची तयारी दाखवली.

या याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ईडीने रेडीरेकनर दराने 11 लाख रूपये भाड्याची मागणी केली. अखेर डीएसकेने दोन महिन्यांसाठी 11 लाख रुपये भाडे देण्याचे तयारी दर्शविली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.