नगर – सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ऑनलाइन शॉपिंग या खरेदीच्या नव्या प्रकारामुळें बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. मात्र, ऑनलाइन खरेदीचा मोठा फटका स्थानिक बाजारपेठला बसत आहे. आता पूर्वीपेक्षा दुकानात जाऊन खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले.
सध्या देशात ऑनलाईन विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या सण – उत्सवाला ग्राहकांना खरेदीत मोठ्या प्रमामात सूट, ऑफर्स देतात. त्यामुळे ग्राहकवर्ग ऑनलाइन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. शिवाय, या कंपन्या ग्राहकांना अगदी घरपोच सेवा देतात. यामुळे ग्राहकांची ऑनलाईन शॉपिंग करण्यासाचे प्रमाण वाढले. याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला.
ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने कपडे विक्रेते, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या विक्रेत्यांवर संकट कोसळले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कंपन्याकडून ग्राहकांनावर मोठ्या प्रमाणात सवलती देऊन आकर्षित केल्या जाते. परिणामी व्यावसायिक आणि विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. या ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या वेबसाईट आणि ऍप्सच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यन्त पोहोचत आहेत.
आज स्मार्टफोन युजर्स ऑनलाइन खरेदी करतात. त्याचा परिणाम केवळ विक्रेत्यांवरच होतो अस नाही. तर त्याचा परिणाम पूर्ण बाजारपेठेवर होतो. यामुळे व्यावसायिकांडून त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांची कपात केल्या जाते. ऑनलाइन बाजारात विविध सूट आणि आकर्षक सवलती यामधून ग्राहकांची लूट होऊ शकते. तरी देखील ग्राहक ई-कॉमर्स कंपण्याकडून मिळणाऱ्या फसव्या सवलतींना बळी पडतात. मात्र, फसवणूक होऊन देखील फसवणूक झाल्याच्या तक्रारी ग्राहक दाखल करत नाहीत. अजून जिल्हा पोलिस खात्याच्या सायबर विभागात फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला नाही.
ऑनलाइनसाठी पासवर्ड बदला
ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी त्यांचा पासवर्ड सतत बदलण्याची गरज आहे. सध्या विविध ऑनलाइन वेबसाइट नानाविध ऑफर्ससह बाजारात आहेत. पण, या ऑफर्सची सत्यता तपासून मगच ग्राहकांनी खरेदी करावी पाहिजे. घाईघाईत ऑर्डर देऊ नये. ऑनलाइन खरेदी करताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडावा. त्यातून फसवणुकीची शक्यता जवळपास नसतेच. पण हा पर्याय उपलब्ध नसल्यास शक्यतो कार्डने पैसे भरू नये. ते हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. कार्ड अथवा नेट बॅंकींगने खरेदी केल्यास व्यवहार झाल्यानंतर तात्काळ पासवर्ड बदलणे गरजेचे आहे.