दारु पाजून आत्महत्येस प्रवृत्त केले 

पिंपरी – पतीस दारू पाजून त्यास मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी फिर्याद पत्नीने दिली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

चेतराज विश्वकर्मा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गोपी परिवार, अमर परिवार, जयराम जयगड (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी आरोपींची
नावे आहेत.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चेतराज यांनी आत्महत्या केली. मात्र चेतराज यांचे मित्र गोपी परिवार, अमर परिवार व जयराम जयगडी यांनी चेतराज यांना विशालनगर येथील नदीच्या पुलावर नेऊन त्यास दारू पाजली. त्यानंतर त्यास शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले. पोलीस उपनिरीक्षक कुमटकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.