रोहित पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना : राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

जामखेड – आगामी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज करणार असून त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत शहरात मोठं शक्तीप्रदर्शन करून मिरवणूक काढली आहे.

कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. अक्काबाई मंदीरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर सभा होणार आहे. यावेळी सभेत रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

मिरवणूकी दरम्यान रोहित पवार यांनी आज पिवळा शर्ट घातला होता. नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करतात. म्हणजेच रंग फॉलो केले जातात. त्याबाबत रोहित पवार यांना आज त्यानिमित्तानेच रंग फॉलो केला की काय असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर रोहित पवार म्हणाले, “मला आईने सांगितलं, हा कलर घाल, त्यामुळे मी हा शर्ट घातला. कारण माझा आईवर विश्वास आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.