शिक्रापूर -कासारी फाटा (ता. शिरूर) जवळ अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकल्याने कारचालकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल किसन घायाळ (रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. स्वप्नील विष्णू शिंदे (रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.
शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करीत आहे.