भोर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी माळवाडी (संगमनेर) जवळील एका शेतकरी कुटुंबातील वायरमनच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत नौदलात सेवा केली. त्यामुळे कर्मभूमीची सेवा करण्यासाठी भोरची निवड केली. वर्षभरापूर्वी डॉ. चंद्रशेखर राऊत यांनी भोर शहरात डॉ. राऊत हॉस्पिटल सुरू केले. अत्याधुनिक सुविधा, समाजाशी बांधिलकी जोपासत डॉ. राऊत यांनी अल्पावधीत तालुक्यात अढळ विश्वासार्हता निर्माण केली आहे.
भाटघरजवळील माळवाडी येथील 700 ते 800 लोकसंख्येचे गाव. एका शेतकरी कुटुंबातील धर्मराज बाबूराव राऊत यांनी प्रतिकूल परिस्थिीत शिक्षण घेत महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरी केली. त्यांच्या पदरी तीन मुले. तीही उपजत बुद्धिमत्तेची.
धर्मराज राऊत यांचा मुलगा चंद्रशेखर राऊत यांचे शिक्षण चौथीपर्यंत गावातच झाले.त्यानंतर संगमनेर येथील राजगड ज्ञानपीठच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 5 वी ते 10 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 11 वी आणि 12 वीपर्यंतचे शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात पूर्ण केले.
त्यानंतर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे एमडीसाठी प्रवेश घेतला. एमडीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे ते नौदलात मुंबई येथे कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदव्या संपादन केल्या.
नौदलातील नोकरीनंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉ. चंद्रशेखर राऊत यांनी भोर येथे 16 फेब्रुवारी 2020 मध्ये डॉ. राऊत हॉस्पिटल सुरू केले. या समाजसेवेचा वसा घेत त्यांनी तालुक्यातील मातीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही.
हॉस्पिटलमध्ये दुर्गम आणि डोंगरी भागातील येणाऱ्या महिलांना त्यांनी दर्जेदार सुविधा, उपचार दिले. अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, सोनोग्राफी मशीन, नवजात शिशूसाठी अतिदक्षता विभाग आदी सुविधा पुण्यापासून जवळच असलेल्या भोर शहरात उपलब्ध केल्या. त्यामुळे सध्या करोनाच्या महामारीत जनतेशी सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्ययास येत आहे.
अल्प दरात अवघड शस्त्रक्रिया
डॉ. राऊत हॉस्पिटलमध्ये एका महिलेची गर्भनलिकेतील ट्यूब फाटून रक्तस्राव झाला होता. डॉ. राऊत यांनी या महिलेवर उपचार करीत तिला जीवदान दिले आहे. पुण्यासारख्या शहरात यावर लाखो रुपये खर्च होतात. मात्र, राऊत हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात आली. डॉ. राऊत यांनी 16 महिन्यांपासून दर्जेदार सुविधा उपलब्ध करीत भोर, वेल्हे तालुक्यांसाठी आदर्शवत ठरले आहे. इतकी आपुलकी, विश्वासार्हता, सुविधा उपलब्ध करण्यात डॉ. राऊत हे अल्पावधीत यशस्वी ठरले आहेत.
जन्मजात शिशूवर उपचार
डॉ. राऊत हॉस्पिटलमध्ये जन्मजात शिशूसाठी अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीत महागडे उपचार करण्यापेक्षा तालुक्यातील रुग्णांना भोर शहरात उपचार सुरू केले आहेत. मोठ्या शहरात यावर लाखो रुपये खर्च होतात. मात्र, राऊत यांनी माफत दरात उपचार सुरू केले आहेत.
त्यामुळे भावी पिढी सुदृढ आणि निकोप होण्यासाठी हॉस्पिटलने आपला वसा कार्यरत ठेवला आहे, हे भोर आणि वेल्हे तालुक्याला दिलासादायक ठरले आहे. डॉ. चंद्रशेखर राऊत आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका राऊत-महाजन यांनी सामाजिक बांधिलकीतून रुग्णसेवेचा वसा समर्थपणे पेलला आहे. हे भोर आणि वेल्हे तालुक्यांसाठी अभिमानास्पद आहे. भोरच्या कुशीत आरोग्य सेवा देताना समाजभानाची प्रचिती संपूर्ण तालुक्याला वारंवार येत आहे.
माजी सैनिकांसाठीअविरत वसा
डॉ. राऊत यांनी आरोग्य सेवेत बांधिलकी जोपासत असताना माजी सैनिकांसाठी त्यांचा वसा ठळकपणे अधोरेखित झाला आहे. भोर तालुक्यात नोंदणीकृत माजी सैनिकांची संख्या 500 आहेत. या सर्वांना एकाच छताखाली आणत त्यांना सुविधा आणि मदतीचा हात देण्यासाठी माजी सैनिक संघटना कार्यरत आहे. या संघटनेने इसीएचएस संस्थेशी करार केला आहे.
ही सेवा गरजेनुसार उपलब्ध करण्यासाठी करार केले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटल, कॅन्टीन आदी सेवा सुरू करण्यासाठी सध्या पाठपुरावा सुरू आहे. भोर-वेल्हे तालुक्यांतील माजी सैनिकांसाठी भविष्यात बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. या कक्षेत पुरंदर आणि खंडाळा तालुक्यांतील माजी सैनिकांना आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
प्रसूती व बालरोग तज्ज्ञ एकत्रच…
डॉ. राऊत यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून वैद्यकीय सेवा देणाऱ्या पत्नी, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका राऊत-महाजन यांच्याकडून आरोग्य सेवेची बांधिलकी भोर तालुक्यासाठी जोपासली जात आहे. एकाच छताखाली प्रसूती आणि बाळांचा दवाखाना आदी सुविधा देणारे डॉ. राऊत हॉस्पिटल हे एकमेव आहे.
डॉ. प्रियंका राऊत-महाजन यांनी बाळांवर उपचार केले आहेत. तसेच करोनापूर्व आणि त्यानंतर लसीकरणासाठी राऊत हॉस्पिटल आदर्शवत म्हणून सर्वतोमुखी मान्यता मिळाली आहे. देशसेवेत कार्यरत राहून समाजाशी बांधिलकी जोपासणाऱ्या आरोग्यसेतूला हातभार लावण्यात डॉ. प्रियंका राऊत-महाजन यांचे योगदान दखलपत्र ठरले आहे.
लसीकरणात अग्रेसर
ओतप्रोत भरलेले देशप्रेम आणि वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा यातून डॉ. राऊत यांनी भावी पिढी सक्षम करण्यासाठी अविरत कार्य सुरू केले आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये करोना लसीकरण सुरू केले. तसेच लहान बाळांचे नेहमीचे लसीकरण दर शुक्रवारी मोफत देण्यात येत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सरकारी सेवा उपलब्ध नसताना प्रांताधिकारी यांच्या आदेशाने दर आठवड्याला 60 ते 70 जणांना लसीकरण करण्यात येत आहे. आवश्यक लसी मोफत दिल्या जात आहेत. हृदय आणि मेंदूचा त्रास असलेल्या बाळांना विशेष लसीकरण करण्यात येत आहे.
नवजात शिशूंना जीवदान
डॉ. राऊत हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंवर उपचार करून जीवदान दिले आहे. आपटी-तऱ्हाटवाडीजवळील एका महिलेच्या 1400 ग्रॅम वजनाच्या नवजात मुलीवर उपचार करीत तिचे वजन दोन किलोपर्यंत नेले आहे. त्यानंतर आणखी एका 1400 ग्रॅम वजनाच्या मुलाला दर्जेदार सुविधा देत त्याचे वजन दोन किलोवर नेले आहे. गेल्या सोळा महिन्यांत हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर किचकट उपचारपद्धतीत कोणताही हयगय न करता त्यांनी कुटुंबातील आपलीच व्यक्ती आहे, हे समजून उपचार केले आहेत.
महामारीत 150 प्रसूती
डॉ. राऊत यांनी करोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वी शासकीय रुग्णालयात जाऊन तिथे 100 ते 150 प्रसूती केल्या. ही सामाजिक बांधिलकी वैद्यकीय क्षेत्रात आदर्शवत ठरली आहे. प्रशासनातील वैद्यकीय सेवेत डॉ. राऊत हे महत्त्वाचा दुवा ठरले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. करोनापूर्व काळातली डॉ. राऊत यांची बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली आहे. जागतिक महामारीचा विळखा संपूर्ण तालुक्याला पडला असताना ते आजही झोकून देऊन काम करीत आहेत.
डॉ. राऊत हॉस्पिटल
मंगळवार पेठ, शाह मेडिकलच्या समोर भोर,
जि. पुणे. फोन : 9356915760