कर्जत – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा शेतात काम करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांनी कर्जत जामखेड ह्या आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या पेरणीची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी व शेतमजुरांशी त्यांनी संवाद सुद्धा साधला.
वेळेवर पाऊस पडल्याने मतदारसंघातली पिकं जोमात आलीत आणि सध्या खुरपणी, कोळपणीची कामं वेगात सुरू आहेत. काल कर्जतमध्ये दत्ता पाडुळे यांच्या शेतात यंत्राद्वारे कोळपणी सुरू असताना मीही ते यंत्र चालवून बघितलं. यावेळी स्थानिक शेतकरी आणि इथं खुरपणाऱ्या महिला भगिनींसोबतही चर्चा केली. pic.twitter.com/A1gfySfeni
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 1, 2021
यावेळी दत्ता पाडुळे यांच्या शेतात यंत्राद्वारे कोळपणी सुरू असताना रोहित पवार यांनी ते यंत्र चालवून बघितले. त्यांच्या हा काम करतानाचा फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.
रोहित पवार म्हणाले, ”वेळेवर पाऊस पडल्याने मतदारसंघातली पिकं जोमात आलीत आणि सध्या खुरपणी, कोळपणीची कामं वेगात सुरू आहेत. काल कर्जतमध्ये दत्ता पाडुळे यांच्या शेतात यंत्राद्वारे कोळपणी सुरू असताना मीही ते यंत्र चालवून बघितलं. यावेळी स्थानिक शेतकरी आणि इथं खुरपणाऱ्या महिला भगिनींसोबतही चर्चा केली.”