IPL 2024 (DC vs RR, Match 56 Result) : आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने होते. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह संघाने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
दिल्ली संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावाच करता आल्या.संजू सॅमसन यानं राजस्थानकडून एकाकी झुंज दिली. संजू सॅमसन यानं 46 चेंडूमध्ये सर्वाधिक 86 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. तर रियान परागने 27 आणि शुभम दुबेने 25 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि खलील अहमद यांनी सर्वाधिक 2-2 बळी घेतले. तर अक्षर पटेल आणि रशीख यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
राजस्थान संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्यांचा एका धावेने पराभव केला होता. त्याचवेळी दिल्लीचा 12 सामन्यांमधला हा सहावा विजय ठरला. त्याचे 12 गुण आहेत. संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याचवेळी राजस्थान संघाला प्लेऑफसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचे 16 गुण आहेत. दिल्लीचा पुढील सामना 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी येथे होणार आहे. त्याचवेळी 12 मे रोजी चेपॉकमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 221 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. अभिषेक पोरेल, जॅक फ्रेझर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अभिषेक आणि जॅक यांनी अर्धशतके झळकावली तर ट्रिस्टननेही शेवटी जोरदार फटकेबाजी करत आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Innings Break!
Dominant batting display from the hosts help set a target of 2️⃣2️⃣2️⃣🎯
Which side are you with at this stage? 🤔#RR chase coming up ⏳
Scorecard ▶️ https://t.co/nQ6EWQGoYN#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/lAFfAtoHLw
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2024
जेक फ्रेझर मॅकगर्कने 20 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या तर अभिषेक पोरेलने 36 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. याशिवाय शाई होप 1 धावा करून, अक्षर पटेल 15 धावा करून आणि कर्णधार ऋषभ पंत 15 धावा करून बाद झाला. आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या गुलबदिन नायबने 19 धावा केल्या. त्याचवेळी ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. रसिक दार सलामने तीन चेंडूंत नऊ धावा केल्या तर कुलदीप यादवने दोन चेंडूंत पाच नाबाद धावा केल्या. रसिक सलाम डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने तीन चेंडूत नऊ धावा केल्या.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
राजस्थानकडून अश्विनने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने आपल्या 4 षटकात 24 धावा दिल्या. तर ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. आवेश खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकात 42 धावा दिल्या.