मुंबई – महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इतकं तापलं कि हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. याच प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा व्हिडियो शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे.
“एका भगिनीला असे छळून काय मिळते ह्या भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस. #हे_राम” असं म्हणत त्यांनी ट्विट केले आहे.”
एका भगिनीला असे छळून काय मिळते ह्या भक्तांना
विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस #हे_राम pic.twitter.com/kNFSVFupYq— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2022
यापूर्वीही जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला होता व्हिडीओ
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
“ तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेवबल फाटकी जीन्स घालणाऱ्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरूनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?” असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022