नगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या दूरदृष्टीने निर्णय घेत सहा वर्षापूर्वी 21 जून हा दिवस योगा दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला आज योगाचे महत्व पटले आहे. करोनावर मात करण्याची क्षमता फक्त योगशक्तीत आहे. नित्याने योग केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले.
अंतरराष्ट्रीय योग दिन सर्वांनी घरातच परिवारासह योग करून साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांनी आपल्या नातींसह घराच्या गच्चीवर विविध योगासने करून अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.