नवी दिल्ली : आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटपटू सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याच्याच बळावरभारतातील क्रिकेटचे नियमन करणारी बोर्ड फॉर कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया म्हणजेचबीसीसीआय ही सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना समजली जाते. तसेच क्रिकेटपटू विराटकोहलीची संपत्ती 1000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आहे.
तो सध्या जगातील खेळणारासर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याची घटना ही हेडलाईन होते. मात्र भारतातील क्रिकेटपटूंचाविचार केला तर प्रथम श्रेणीतील माजी क्रिकेटपटू समरजीत सिंह रणजीत सिंह गायकवाड हेसर्वात श्रीमंत क्रिकेटपटू समजले जातात. अर्थात त्यांना वारसा हक्काने मोठी संपत्तीमिळालेली असल्याने ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरले. त्यांचा जन्म २५ एप्रिल1967 रोजी झाला. ते बडोद्याच्या राजघराण्याचे वारसदार आहेत.
रणजीतसिंह प्रतापसिंहगायकवाड आणि शुभांगिनीराजे गायकवाड यांचे ते एकुलते एक पुत्र आहेत. मे 2012 मध्येरणजीत सिंह गायकवाड यांचे निधन झाल्यावर समरजीतसिंह गायकवाड यांनाराज्याभिषेक करण्यात आला. त्यांच्याकडे वारसा हक्काने 20 हजार कोटी रुपयांची संपत्तीचालून आलेली आहे. समरजीत सिंह गायकवाड हे लक्ष्मी विलास राजवाड्याचे मालकआहेत. ते जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील 17 मंदिरांच्या ट्रस्टचे नियंत्रणही त्यांच्या ताब्यात आहे. समरजीत सिंह गायकवाड यांचा विवाह गुजरात मधील वांकानेर येथील राजघराण्यातील राधिकाराजे यांच्याशी झालेला आहे.
समरजितसिंह हे बडोद्याकडून रणजी करंडकासाठी खेळले आहेत. तसेच आघाडीचे फलंदाज म्हणून प्रथम श्रेणीतील सहा सामन्यात खेळलेले आहेत. बडोदा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी हे क्रिकेटपटू देखील आज हजारो कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र त्यांनी ही संपत्ती स्वतःच्या गुणवत्तेच्या आणि प्रतिभेच्या जोरावर कमावलेली आहे. बीसीसीआय बरोबरील करारातील ए प्लस वर्गातील क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीला वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. त्याखेरीज प्रत्येक कसोटी सामन्यासाठी त्याला पंधरा लाख रुपये आणि एक दिवसाच्या सामन्यासाठी सहा लाख रुपये तसेच t20 सामन्यासाठी तीन लाख रुपये मिळतात. आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळताना त्याला वर्षाला 15 कोटी रुपये मिळतात.
भारताचा माजी लोकप्रिय फलंदाज सचिन तेंडुलकर कडे 1250 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता, लोकांचे सचिनबद्दलचे प्रेम आणि आदर जसा त्याला क्रिकेटच्या मैदानात मिळत होता, तसाच आजही आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक सामने जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सचिनने त्याच्या बॅटने जितक्या धावा केल्या, त्याच्या दुप्पट त्याने प्रसिद्धी आणि पैसे कमावला.
निवृत्तीनंतरही सचिन लक्झरी लाइफचा आनंद घेत आहे. तो 100 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहत असून वर्षाला करोडो रुपये कमावत आहे. तर भारताचा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सुमारे १140 कोटी रुपयांची संपत्ती आहे. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं 15 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती. धोनी सध्या रांचीमध्ये राहतो.
धोनीचे रांची आणि मुंबईमध्ये आलिशान बंगले आहेत. त्यानं 2011 मध्ये देहराडूनमध्ये 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बंगलाही खरेदी केला होता. धोनीकडे जगातील अनेक आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये हमर, पोर्श 911, ऑडी, मर्सिडीज, मित्सुबिशी पजेरो, रेंज रोव्हर यांचा समावेश होतो. एवढंच नाही तर त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय, कावासाकी निंजा एच 2, आणि कॉन्फेडरेट हेलकॅट एक्स३२ बाईकदेखील आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या मालकीच्या सात लक्झरी वाहनांची किंमत सुमारे 12.5 कोटी रुपये आहे. त्यानं अनेक ठिकाणी सुमारे 620 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.