पुणे – आज शनिवार… हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शनिदेवाची मनोभावे पूजा केली जाते. शनिदेवांना कर्म फळ देणारे म्हटले जाते. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ आणि पुरस्कार देतो.
मात्र, हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय संपूर्णतः भगवान शनिदेव घेतो. कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहूशकत नाही. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी आणि शनी जयंतीच्या दिवशी शनिची मनोभावे पूजा करतात.
असे म्हंटले जाते कि शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले तर रस्त्यावरील भिकारी व्यक्ती सुद्धा राजा बनतो. जर तुम्हाला देखील शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर खाली दिलेले काही सोपे उपाय नक्की करून बघा….
1) दर शनिवारी एखाद्या काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती दिली पाहिजे. याशिवाय दुध, ब्रेड, बिस्किट वगैरे जे काही आहे ते सुद्धा दिले जाऊ शकते. पण, शनिवारी कुत्र्यांची सेवा करावी. जर तुम्ही हे रोज केले तर ते चांगले परिणाम देईल.
2) कोणत्याही गरजूंना मदत करा आणि वडीलधाऱ्यांची सेवा करा. ते लोक शनिदेवाला खूप प्रिय आहेत जे त्यांच्या वडीलधाऱ्यांचा आदर करतात आणि गरजूंना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. तुम्ही काळी उडीद डाळ, मोहरीचे तेल, काळे तीळ इत्यादी कोणत्याही गरजूंना दान करु शकता.
3) सफाई कामगार तुमच्या घराभोवती सफाईसाठी येतील. शनिवारी या सफाई कामगारांना तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करा. शक्य असल्यास काळे कपडे किंवा काळ्या वस्तू दान करा. यामुळे शनिदेवांचा आशीर्वादही मिळतो.
4) शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्तू बांधावी. त्याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे. त्यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तिस काळे वस्त्र आणि त्यात गुंडाळलेल्या वस्तू दान कराव्यात. प्रत्येक शनिवारी केल्यास काही दिवसातच त्याचे सकारात्मक फळ मिळण्यास प्रारंभ होईल.