स्वार्थासाठी चुकांची पुनरावृत्ती नको!

इसीएचे आयुक्‍तांना निवेदन : कचऱ्यासाठी प्लॅस्टिक बकेटचे वाटप न करण्याची मागणी

पिंपरी – केवळ आर्थिक स्वार्थापोटी कचरा संकलनासाठी प्लॅस्टिक बकेटचे वाटप करण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप करत स्वार्थासाठी चुकांची पुनरावृत्ती करु नये, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समिती (इसीए)च्या वतीने मनपा आयुक्‍तांकडेक करण्यात आली आहे.

इसीएने आयुक्‍तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा आरोग्य विभाग नागरिकांना कचरा संकलन / साठवणूक साठी मोफत प्लॅस्टिक बकेटचे वाटप करण्याचा घाट घालत आहेत . सन 2013-14 मध्ये हा प्रयोग राबविला गेला होता व त्यामुळे त्या कालावधीत महापालिका सभागृहात त्या बकेट खरेदीत भ्रष्टाचार झाला म्हणून खूप वाद निर्माण झाले होते व त्या घडलेल्या चुकीतून सुधारणा होण्याऐवजी पुन्हा तीच चूक जाणीवपूर्वक आर्थिक स्वार्था पोटी केली जात आहे.

कचरा संकलनासाठी प्लॅस्टिक बकेट खरेदी व मोफत वाटप विषय सभागृहा समोर वारंवार आणला जात आहे. या खरेदीसाठी अपेक्षित खर्च अनावश्‍यक आहे व अशा मोफत बकेट वाटपातून कोणताही बदल अथवा फायदा होणार नाही. अशा कोणत्याही प्रस्तावास मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशाराही या निवेदनात दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.