पिंपरी – आपले घर-कुटुंब सोडून देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या लष्कराच्या जवानांसह दरवर्षीप्रमाणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीय आणि मुलांसोबत दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. अग्रवाल समाज फेडरेशनसह विविध संघटनांचा सहभाग घेतला.
29 एएफडी देहू रोड येथे समाजसेवक डॉ. रमेश बन्सल यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी स्नेह मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर विनीत कुमार होते. यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश्वर जांजळे, डॉ. वेधाई जांजळे उपस्थित होते. या कार्यक्रमात अग्रवाल समाज फेडरेशन पुणे, खाना बचाओ-खाना खिलाओ संस्था, डॉक्टर असोसिएशन देहूरोड, वीर सावरकर मंडळ निगडी, अग्रवाल समाज चिंचवड प्राधिकरण आदी संघटनांनी सहभाग घेतला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद बन्सल, वेदप्रकाश गुप्ता, डॉ. अनिल मित्तल, डॉ. विजय कुमार चौधरी, भास्कर रिकामे, मुकेश बन्सल, शीला वेद प्रकाश गुप्ता, कमला गुप्ता, इरा बन्सल, ऊर्मिला अग्रवाल, राजकुमार गुप्ता, निर्मल अग्रवाल, रामशरण गुप्ता, देहूरोड डॉक्टर असोसिएशनच्या पथकातील डॉक्टर, त्यांचे कुंटुंबीय, मुले तसेच गुडिया बन्सल, रियान बन्सल, इरा बन्सल, आरव अग्रवाल आदींनी सहभाग घेतला.
रुहानी बन्सल हिने स्वतः सैनिकांसाठी दिवाळी ग्रीटिंग कार्ड बनवून भेट दिले. समारोपप्रसंगी मेजर विनीत कुमार म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी आपल्या मूळ गावापासून दूर राहणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.