कोरोनासमोर जग हतबल ; जगभरात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणूसमोर संपूर्ण जग हतबल झाल्याचे दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाख 61 हजारांवर पोहोचली आहे. तसेच 46 लाख 20 हजारांहून अधिक लोक ठिक झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाख 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिर रुग्ण आणि मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 33158 रुग्ण आढळून आले आहेत, तर 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 55,209 रुग्ण आढळून आले असून 49,090 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.21 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा समावेश कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.