सातारा -माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा (एचएससी) निकाल गुरुवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. सातारा जिल्ह्याचा निकाल 92.18 टक्के लागला असून कोल्हापूर विभागात जिल्हा दुसरा आला आहे.
सातारा जिल्हयाचा निकाल 92.18 टक्के लागला आहे. मागील वर्षी 86.23 टक्के निकाल लागता होता. त्यामध्ये यावर्षी 6 टक्के वाढ झाली आहे. नियमित विद्यार्थी शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.
विज्ञान शाखा- 98.61 टक्के, कला शाखा- 80.18 टक्के, वाणिज्य शाखा- 95.69 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम- 90.70 टक्के असा निकाल लागला आहे. रिपीटर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 31.68 टक्के लागला आहे. शाखानिहाय पुढीलप्रमाणे आहे. विज्ञान शाखा- 63.71 टक्के, कला शाखा- 17.70 टक्के, वाणिज्य शाखा- 28.77 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम- 24.37 टक्के.