जामखेड – वर्षश्राद्धानिमित्त सर्वत्र जेवणावळी घालण्याच्या प्रथा आपण बहुतांशी ठिकाणी पहातो. आपल्या आईच्या सहाव्या पुण्यस्मरणा दिनी जेवणावळी कार्यक्रमाला फाटा देत स्वप्नील बरबडे यांनी आपल्या आई स्व संगीता अंकुश बरबडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्ताने जामखेड येथील ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालयत शालेय साहित्य व खाऊ वाटून एक आदर्श समाजासमोर ठेवला या उपक्रमातून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज आहे
यावेळी स्वप्नील बरबडे,पत्रकार ओंकार दळवी,ह भ प अमृत महाराज डूचे,ऋषिकेश वराट,शाळेचे मुख्याध्यापक गणेश गर्जे,अनिल दहिफळे,संतोष अडसूळ,रमेश मैड,गुफरान कुरेशी,संकेत गुणाले,उपस्थित होते.