नगर – हमाल पंचायत परिसरात मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यातील हजारो वारकारींना जिल्हा केमिस्ट असोसिएशन, अन्न व औषधे प्रशासनच्या वतीने मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. अन्न व औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे व हेमंत मेटकर यांच्या उपस्थितीत या सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, स्व.ओमप्रकाश गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र गुलाटी, उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनीष सोमणी, खजिनदार मनोज खेडकर आदींसह सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. वारकारींना सर्वप्रकारच्या प्राथमिक आजारावर मोफत औषधे देण्यासाठी तीन दिवस मार्केट कमिटीच्या प्रांगणात कॅम्प लावण्यात आला आहे. सुमारे 3 लाख रुपयांच्या विविध औषधांचे वाटप येथे करण्यात येत आहे.
यावेळी गौतम भंडारी, अमित गोयल, प्रतिक शिंगी, किरण रासकर, श्रीनिवास बोडखे, देवीदास काळे, अमित धाडगे, कमलेश गुंदेचा, संकेत गुरव, महेश आठरे आदी उपस्थित होते.