Ayodhya Ram Mandir – आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक जण अयोध्येत पोहोचले आहेत. या राम मंदिराच्या क्रेझमध्ये सुपरहिरो कसे मागे राहतील? स्पायडरमॅनपासून वंडरवूमनपर्यंत सर्वांच्याच मनात हा उत्साह आहे.
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात स्पायडरमॅनपासून बॅटमॅन आणि हल्कपर्यंत सगळेच राम लल्लाच्या सेवेत हरवले आहेत. ही छायाचित्रे एआयने बनवली आहेत, ज्यामध्ये तुमच्या आवडत्या सुपरहिरोने अयोध्येत येऊन काय केले असेल याची कल्पना करण्यात आली आहे.
फोटोंमध्ये, बॅटमॅन आणि आयर्न मॅन हातात झाडू घेऊन मंदिराची स्वच्छता करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये स्पायडरमॅन आणि हल्क एकत्र संतांना भोजन देत आहेत. डेडपूल आणि जोकरही अयोध्येत एकत्र काम करत आहेत. दोघे मिळून मंदिराची स्वच्छता करत आहेत.
सुपरमॅन सुद्धा काम करण्यापासून दूर कसा राहील? फोटोमध्ये सुपरमॅन खांद्यावर फुलांची टोपली घेऊन जात आहे. त्यांनी भगव्या रंगाचे धोतर परिधान केले आहे. स्टार वॉर्समधील दोन पात्र थंडीमुळे आगीजवळ बसले आहेत.
जॅक स्पॅरो आणि वंडर वुमन यांनी प्रभू रामाच्या स्वागतासाठी दिवे लावले आहेत. भगवान राम यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत होणार आहे.त्याचप्रमाणे अयोध्येत रामललाच्या स्वागतासाठी अनेक सुपरहिरो एकत्र काम करताना दिसत आहेत.
ही चित्रे इतकी सुंदर आहेत की त्यांच्यापासून आपली नजर हटवणे फार कठीण आहे. ही छायाचित्रे पाहून प्रत्येकजण सर्जनशीलतेचे कौतुक करण्यास मागे हटत नाही.