कात्रज (प्रतिनिधी) – पुणे शहरामध्ये कोरोना विषाणुजन्य साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर लोकलॉक डाऊन करण्यात आल्याने शहरातील व कात्रज परिसरातील गरजू व वेठबिगार हात कामगार यांचे कामधंदे बंद पडल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उभा राहिला होता.
यासाठी कात्रज येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय संतोष नगर (कात्रज) कल्पना संभाजी थोरवे शिवसेना संपर्क संघटीका, शिवअंगणवाडी सेना जिल्हा संघटीका यांनी व सामाजिक कार्यकर्ते अँड संभाजी थोरवे यांच्यामार्फत कात्रज व संतोष नगर परिसरातील गरजू नागरिकांना स्वः खर्चा ने सोशल डिस्टन्स नियम पाळून प्रत्येक गरजू व वेठबिगार कामगार कुटुंबाला धान्य साखर, तूरडाळ, गहू,तांदुळ, बेसन पीठ, तेल असे एकत्रित किराणा सामान चे साडेचारशे कीट वाटप केले.
याच बरोबर आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासन एक कायम कार्यरत असते त्यांचेही आभार करून तेवढेच कमी याकरता मा नगरसेविका कल्पना ताई थोरवे व ऍड संभाजीराव थोरवे यांच्यामार्फत कात्रज परिसरातील वाहतूक पोलीस व कर्फ्यू वर तैनात पोलीस यांना मास्क व ड्रायफ्रुट्स यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अल्पना पवार,गीतांजली जाधव विद्या चव्हाण, अखिल विग्हर्ता,प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश पवार संदीप शेट्टी, अमित थोरवे, सागर रानगावकर, आशुतोष कदम, श्रीकांत शिंदे, वसीम खान, उपस्थिती होते.