नगर – चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राहुरीत हातावर पोट असलेल्या गटई कामगारांसह मोलमजुरी करणाऱ्या गरजूंना जीवनावश्यक अन्न-धान्याचे किराणा किट, सॅनीटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे, सुभाष मराठे यांच्या पुढाकारातून राज्यात हातावर पोट असलेल्या गटई कामगारांसह इतर गरजूंना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू देण्याचा उपक्रम चालू आहे. राहुरी येथे एकनाथ अभंग, अजित रोकडे यांच्या योगदानातून हा उपक्रम राबविण्यात आला. निलेश आंबेडकर, मनिष कांबळे, किरण घनदाट, सुभाष मुदळ, उपस्थित होते.