वाल्हे -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या गोपीनाथ पडळकर यांची संस्कृती, संस्कार व बुद्धीचे प्रतिबिंब त्यांच्या विचारात दिसून येत आहे.
हिमालयाची उंची असलेल्या पवार यांच्यासारख्या माणसावर पडळकरसारख्यांनी टीका केल्याने टेकडीची उंची कधीही मोठी होत नाही. असा हल्ला पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे (ता. पुरंदर) येथे पडळकरांच्या वक्तव्यावर चढविला.