नवी दिल्ली – सपाकडून भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये विघ्न आले आहे. पूर्वांचल मतदारसंघामध्ये सर्वाधिक मागासवर्गीय, मुस्लीम आणि ओबीसीचे मतदान हे आतापर्यंत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेसाठीचे पूर्वांचलमधील मतदारसंघ हे सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरले आहेत. याशिवाय याठिकाणी आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये कलाटणी बसणारे चित्र दिसून आले. त्यामुळेच पूर्वांचलमधील मतदानाचे वारे हे सर्वच पक्षांसाठी चकवा देणारे ठरत असल्याचे म्हटले जाते. कारण, गतवेळी मोदी लाटेने देशभरात सत्तापालट झाली होती.
मात्र, याठिकाणी भाजपच्या पदरात निराशा पडल्याची नोंद आहे. त्यामुळे यंदाही या पूर्वांचलमधील मतदानादरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कस लागणार आहे. आता उत्तर प्रदेशच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान मोदी आणि योगी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या आतापर्यंत पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये आतापर्यत 292 जागांसाठी व्यवस्थित पद्धतीने मतदान झाले आहे. आता सहावा व सातव्या टप्प्यातील मतदान राहिले आहे. या दोन टप्प्यामध्ये उर्वरित 111 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जागा ह्या पूर्वांचलमधील आहेत. याठिकाणचा निकाल हा सर्वांना धक्का देत आला आहे. त्यामुळे येथे सर्वच पक्षांचे लक्ष आहे.
सपाला धक्का; पूर्वांचलमध्ये “जैसे थे’
मोदी लाटेतून 2017 मध्ये समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ला आजमगडमध्ये मोदी लाटेने मोठा विजय संपादन केला होता. मात्र, पूर्वांचलमध्ये मोदी लाटेचा परिणाम झाला नाही. याठिकाणी विजयाचे समीकरण वेगळे ठरले. सपाकडून भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये विघ्न पूर्वांचल मतदारसंघामध्ये सर्वाधिक मागासवर्गीय, मुस्लीम आणि ओबीसीचे मतदान हे आतापर्यंत निर्णायक ठरत आलेले आहे.