पुणे – दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्ष सन्मान करत आला आहे. आता होम मिनिस्टरच ‘महामिनिस्ट’र हे नवीन पर्व येत्या ११ एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात आदेश बांदेकर विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी देणार आहेत.
या पैठणीला सोन्याची जरी असेल पण हि ११ लाखांची पैठणी कशी असेल, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
नुकतंच, या मालिकेचा ऑफिशल प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सध्या मालिकेचा हा प्रोमो चांगलाच चर्चेत आला असून, ११ लाखांच्या पैठणीवरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया मांडल्या आहेत. “११ लाखाची पैठणी १ जणी ला देण्यापेक्षा, ११ लाख गरीब महिलांना साधी साडी दिली तरी चांगलच होईल’ असं प्रतिक्रिया एका महिलेने दिली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे.