मेढा – जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी या आठ गावांतील एकूण २१ बंद घरांची एकाच मध्यरात्रीम घरफोडी झाली असून चोर पसार झाले आहेत. मात्र, चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावंच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. आज सकाळी सातच्या दरम्यान याची खबर मेढा पोलिसांनाच लागताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी घटनास्थळी भेटी देऊन तपास गतीमान केला सून श्वान पथक बोलवले आहे.
जावळीत एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी २१ घरफोड्या होण्याचा मोठी घटना आहे. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले असले तरी त्यांचे टाळे तोडणे, घरातील तिजोरी फोडणे, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करणे यासाठी त्यांनी अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज आहे.
चोरांनी करंजेमध्ये दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत आठ घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडीत एक घर, केडंबेत तीन घरे, वाळंजवाडीत एक घर व वरोशीत एक घर अशी २१ घरे एका रात्रीत फोडली आहेत . यामध्ये किती कोणाचे नुकसान झाले आहे हे नेमके समजू शकले नसले तरी लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे. या एकूण वातावरणामुळे पश्चिम जावळीत भीतीचे वातावरण झाले आहे.