मुंबई – दक्षिण सुपरस्टार महेश बाबू नेहमीच आपल्या चित्रपटातील भूमिकेतून चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिणेकडल्या चाहत्यांसोबतच त्याचा इतर भाषांमधील चाहता वर्ग आहे.
View this post on Instagram
अभिनेता महेश बाबूचे जगभरात लाखो चाहते असल्यामुळे तो नेहमीच सोशलवर मीडियावर चर्चेत असतो. महेश बाबूचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला करतो.
View this post on Instagram
अशातच गेल्या अनेक दिवसांपासून महेश बाबू बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. यावर महेश बाबूने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याला एका कार्यक्रमात पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्ही हॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चाही समोर येत आहे. ? या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की,’मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही, मी फक्त तेलुगू चित्रपटातच काम करू शकतो’
View this post on Instagram
महेश बाबू पुढे म्हणाले,’राहिला प्रश्न हॉलिवूड पदार्पणाचा तर मला अजून तरी कुठल्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. त्यामुळे मला या प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती नाही.’ असत म्हणत त्याने स्वत: यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, महेश बाबूने 1999 साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा कुमारुडू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट करण्याआधी त्याने बालकलाकार म्हणून 9 चित्रपटांमध्ये काम केले होते.