“दबंग-3’नंतर पुन्हा एकदा प्रभुदेवासोबत तो चित्रपट साकारत आहे. या चित्रपटाचे नाव “राधे ः इंडियाज मोस्ट वॉन्टेड कॉप’ असे आहे. यात सलमानच्या ऑपोजिट अनुष्का शर्माच्या नावाची चर्चा होती. पण आता अभिनेत्री दिशा पाटनीचे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटातील शूटिंग दरम्यानचे किस्से सलमानसह इतर कलाकार सध्या सोशल मीडियावर शेअर करीत आहे त्यामुळे सध्या राधे चित्रपटाचा ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच सुरु आहे. यातच दिशाने राधे चित्रपटातील डान्सच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. तिने इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे की,’प्रभू देवा सरांचा डान्स स्टेपने माझ्या पाया जखमी झाला आहे.” तिच्या या इंस्टाग्राम स्ट्रोरीवर तिचे फॅन्स तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहे.
दरम्यान, हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या “द आउटलॉज’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यातील शुटिंग मुंबईत करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
And I thought I was tall ! Thank you @landrover_modimotors Worli , for the lovely experience ! #ad
सलमान खान आणि प्रभुदेवा तिस-यांदा एकत्रित काम करणार आहेत. यापूर्वी दोघांनी “वॉन्टेड’ आणि “दबंग-3′ चित्रपटात झळकले होते. यावर्षी डिसेंबरमध्ये “दबंग-3′ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानने 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या “तेरे नाम’मध्ये राधेची भूमिका साकारली होती. तसेच 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “वॉन्टेड’ या ऍक्शन चित्रपटातही राधेची भूमिका साकारली होती.