मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसची समाजवादी पक्षाबरोबर जागा वाटपाची चर्चा अजून सुरू आहे, आत्तापर्यंत एक जागा निश्चीत झाली आहे बाकीची चर्चा लवकरच पुर्ण होईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सपा बरोबर आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सपाने एकच जागा दिली आहे असे चित्र निर्माण झाले होते त्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
ते म्हणाले की अन्य जागांविषयी समाजवादी पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे एक जागा आम्ही आत्तापर्यंत निश्चीत केली आहे. उत्तरप्रदेशात सध्या 1993 सारखी राजकीय स्थिती निर्माण झाली असून त्यावेळी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. आजही तेथे अशीच स्थिती असेल असे ते म्हणाले.