नवी दिल्ली – भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी फिलीपाइन्सने तयारी दाखवली आहे. या क्षेपणास्त्र खरेदीसाठीच्या ब्रह्मोस एरोस्पेसबरोबरच्या 375 दशलक्ष डॉलरच्या कराराला फिलीपाईन्सने मंजूरी दिली आहे. फिलीपाईन्सच्या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी ही क्षेपणास्त्रे खरेदी केली जाणार आहेत.
ब्रह्मोस हा भीरत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित आणि उत्पादित केलेली क्षेपणास्त्रे असून ही क्षेपणास्त्रे लढाऊ जहाजांवरून, पाणबुड्या, विमाने किंवा जमिनीवरूनही डागली जाऊ शकतात.
फिलीपाईन्सच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नौदलासाठी ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव ब्रह्मोस एरोस्पेसने दिला आहे. हा करार 374 दशलक्ष डॉलर किंमतीचा आहे आणि फिलीपाईन्सच्या सरकारने गेल्या महिन्यातच मंजूर केला आहे.
भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळही तैनात केली आहेत.