नाशिक – भरधाव दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामध्ये घडली. या अपघातात नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवार पंकज पवार यांचाही मृत्यू झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पंकज पवार यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मधून राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 19 जानेवारीला निवडणुकीचा निकाल आहे. निकालाआधीच उमेदवार पंकज यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.