पर्यटनावर विसंबलेल्या वेल्हे तालुक्यात पूरक घटकांना जोरदार तडाखा
वेल्हे -करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भोर-वेल्हे तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी आता करोना व्हायरसची चर्चा रंगली आहे.
भोर – वेल्हे तालुका हा अतिदुर्गम व निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे.
परंतु, करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराच्या बाहेर पडू नये, असा प्रशासनाने सल्ला दिल्यानंतर भल्या मोठ्या टॉवरसारख्या इमारतीच्या एका बंद दरवाजाच्या खोलीतील अडकून पडलेल्यांना आपला गाव आठवायला लागला आणि आपोआप त्यांचे पाय गावाकडे वळाले. करोनाच्या भीतीने शहरातून गावाकडे लोंढेचे लोंढे परतू लागले आणि ओस पडलेला गाव गजबजू लागले आहे.
गजबजलेल्या गावांमध्ये कधीही एकमेकांचे तोंड न पाहिलेले करोनावर मोकळ्या व्हायरस चर्चा करू लागले. तसेच ग्रामीण भागातील प्रशासनाने हॉटेल, परमिट बार, यांसारख्या गर्दी जमणाऱ्या ठिकाणी करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन बंदी घातल्याने गावांमध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावचीच व्हायरस चर्चा कानावर पडत आहे.
शहरवासीयांना गावकरी लागले हिणवू
गड्या आपला गावच भारी. या रानावनात काटे कुटे मोडत जीवन जगणेच लय भारी. हा असला करोनो पिरोना या काट्यांसमोर काहीच नाही. शहरातून आलेल्यांना गावाकडे राहणारी मंडळी हिणवू लागली. काय रं तुला आता गाव दिसायला लागला का? लय गावाला नाव ठेवायचा ना, मग कशाला गावाला आलास. आम्ही बघ गावाकडची मंडळी कशी मजेत आहोत. तुझा तो करोना की काय तो आमचं काहीच वाकडं करू शकत नाही आणि जर आलास तर या रानावनातील जडीबुट्टीनी त्याचा नायनाट करू, असे व्हायरल सल्ले मिळत असल्याचे एकंदरीत गावकडे दिसत आहेत.