फलटणमधून 18 जणांचे 21 उमेदवारी अर्ज दाखल
फलटण – फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जणांनी 21 उमेदवारी अर्ज दाखल केलेले असून महायुतीतर्फे दिगंबर आगवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
श्री. आगवणे यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणचे माजी आमदार जयकुमार गोरे आदी प्रमुख त्यांच्यासमवेत उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने डॉ. महेंद्र जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अरविंद आढाव यांनी तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदीप मोर,े प्रजासत्ताक भारत पक्षाच्या वतीने अमोल पवार यांनी अर्ज दाखल केले. तर नंदू मोरे, चंद्रकांत साळवी, पांडू अहिवळे, अमोल करडे, अमोल पाटोळे, प्रशांत कोरेगांवकर, जयश्री आगवणे, डॉ. प्रवीण आगवणे, उमाकांत कांबळे, चंद्रकांत अहिवळे, विकास काकडे व कांचनकन्होजा खरात यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.