तांत्रिक कारणांसाठी काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल

पुणे – मुंबई विभागामधील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान “अप लाइन’च्या अत्यावश्‍यक कामास्तव रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकडे ये-जा करणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या अंशत: आणि पूर्णत: रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

दि. 5 ते 14 ऑक्‍टोबर – कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावणार.
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस पुणे ते कोल्हापूर मार्गावर धावणार
दि. 5 ते 14 ऑक्‍टोबर- हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावणार
दि. 6 ते 15 ऑक्‍टोबर – लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्‍स्प्रेस या कालावधीत पुणे स्थानक ते हुबळी धावणार आहे.
दि. 5 ते 14 ऑक्‍टोबर- भुसावळ-पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस दौंड, मनमाडमार्गे धावणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
मुंबई-पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर, मुंबई-विजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर दि. 5 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.