पुणे – घाटमाथ्यावर पुन्हा धो-धो पावसाचा सुरवात झाली आहे. गेल्या 24 तासांत ताम्हिणी आणि अंबवणे घाटमाथ्यावर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 200 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अंबवणे येथे सर्वाधिक 235, तर ताम्हिणी घाटात 210 मिमी पाऊस झाला.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे घाटमाथ्यावर उंचावरून पडणारे धबधबे सुरू झाले. नदी, नाले भरून वाहू लागले, डोंगर हिरवेगार झाले, हवेत गारवा पसरला. त्यामुळे पर्यटकांना हे वातावरण घाटमाथ्याकडे खेचत असल्याने सुट्टीच्या दिवशी ताम्हिणी, पवना, लोणावळा यासह घाटमाथ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.
24 तासांत घाटमाथ्यावरील पाऊस (मि.मी.)
लोणावळा-103, शिरगाव-168, वळवण-66, अंबवणे-235, भिवपुरी-65, धावडी-167, डुंगरवाडी-153, कोयना-123, खोपोली-92, खंद-72, ताम्हिणी-210, भिरा-119 मि.मी. पाऊस झाला.