मुंबई -गुडघ्यावरी शस्त्रक्रीयेनंतर महेंद्रसिंह धोनी एका नव्या जबाबदारीसाठी सज्ज बनला आहे. भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी धोनीला भारतीय संघाचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेमण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
धोनी हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तसेच 2011 सालची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळेच धोनीच्या अनुभवाचा फायदा या वर्षी खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला होऊ शकतो.
याआधी धोनीला 2021 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉर बनवण्यात आले होते. आता जर धोनीनेही बीसीसीआयचा प्रस्ताव स्वीकारला तर भारतीय संघ विजेतेपद मिळवणार का याकडे लक्ष राहीले.