संघासाठी आवश्यक तेच धोनीने केले; सचिनकडून पाठराखण 

बर्मिंगहॅम – भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्र सिंह धोनी विश्वचषकातील खेळीमुळे सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. प्रत्येक सामन्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या फलंदाजीवर टीका करण्यात येते. तर काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही धोनीच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु,भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर सचिनने धोनीची पाठराखण केली आहे. धोनी जे काही करत आहे, ते संघाच्या भल्यासाठी करत आहे, असे सचिन तेंडुलकरने म्हंटले आहे.

सचिन तेंडुलकर म्हणाला कि, धोनी एक असा खेळाडू आहे जो संघाबद्दल आधी विचार करतो. बांगलादेशविरुद्ध त्याची खेळी महत्वपूर्ण होती. संघाला ज्या गोष्टीची गरज होती त्याने तेच केले. धोनी ५० ओव्हरपर्यंत टिकून राहतो कारण तो अन्य खेळाडूंची क्रीजवर मदत करू शकतो. धोनीकडून हीच आशा होती आणि त्याने ती पूर्ण केली, असे तेंडुलकरने सांगितले.

विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध बांगला देश असा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशपुढे ३१५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रतिउत्तरात बांगलादेशाने जिगरबाज खेळ करत सर्वबाद २८६ धावांपर्यंत मजल मारली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.