#HappyBirthdaySachinTendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आणि 24 तारीख याचं एक खास कनेक्शन आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973ला झाला. हा तो दिवस आहे, त्यादिवशी सचिनने आपल्या जीवनाची सुरूवात केली, त्याचबरोबर 24 तारखेदिवशी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जाणून घेऊया की, सचिनसाठी 24 तारीख का महत्वाची आहे.
#HappyBirthdaySachin 24 एप्रिल 2024 – तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 51 वा वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला.
Happy birthday, @sachin_rt! 🎂
The legendary India batsman played 200 Tests and 463 ODIs, amassing 34,357 international runs, including an incredible 💯 centuries!
What is your favourite “Sachin! Sachin!” moment? pic.twitter.com/UK4tOvE6kQ
— ICC (@ICC) April 24, 2019
सचिनने ( Sachin Ramesh Tendulkar ) आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी आणि 463 वन डे सामने खेळले आहेत.कसोटी मध्ये 49 शतके तर वन -डे मध्ये 51 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून एकूण 34,357 धावा त्याच्या नावे आहेत.
34 वर्षापूर्वी 24 फेब्रुवारी दिवशी 664* धावांची विक्रमी भागीदारी…
24 फेब्रुवारी 1988 – 34 वर्षापूर्वी लहानसा सचिन माध्यमाच्या प्रकाशझोतात आला होता, ज्यामुळे त्याला क्रिकेट विश्वात ओळख मिळाली होती. सचिनने आपला बालमित्र विनोद कांबळी यांच्यासोबत हॅरिस शील्ड स्पर्धेच्या उपांत्यफेरीत नाबाद 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. यामध्ये सचिनने नाबाद 326 आणि कांबळीने नाबाद 349 धावा केल्या होत्या.
Happy birthday, @sachin_rt! 🎂
The legendary India batsman played 200 Tests and 463 ODIs, amassing 34,357 international runs, including an incredible 💯 centuries!
What is your favourite “Sachin! Sachin!” moment? pic.twitter.com/UK4tOvE6kQ
— ICC (@ICC) April 24, 2019
त्यावेळेस काबंळी 16 तर सचिन 14 वर्षांचा होता. ही भागीदारी त्यावेळेस कोणत्याही श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी ठरली होती. सचिन-कांबळी यांनी आॅस्ट्रेलियन जोडी टी. पैटाॅन आणि एन. रिपाॅन यांचा विक्रम मोडीत काढला होता. बुफैले संघासाठी या जोडीने 1913-14 मध्ये 641 धावांची भागीदारी केली होती. दरम्यान 19 वर्षानंतर हैदराबादमध्ये मनोज कुमार आणि मो. शैबाज यांनी 721 (तिसऱ्या विकेटसाठी) धावांची भागिदारी करत हा विक्रम मोडीत काढला होता.
14 वर्षापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक व्दिशतक…
24 फेब्रुवारी 2010 – या दिवशी 39 वर्षीय सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज बनला. ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात सचिनने 147 चेंडूत नाबाद 200 धावा फटकावल्या होत्या.
200* runs
147 balls
25 fours
3 sixes#OnThisDay in 2010, legendary India batsman @sachin_rt became the first batsman to score a double century in ODIs against South Africa in Gwalior. pic.twitter.com/st1koTbieO— ICC (@ICC) February 24, 2019
त्यानंतर दोन वर्षानंतर वीरेंद्र सेहवागने 219 धावा करत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनसह इतर 8 खेळाडूंनी व्दिशतक झळकावले आहेत. रोहित शर्मा याने एकट्याने तीन व्दिशतके केली आहेत.
सचिन आणि 24 तारखेसंबंधी आणखी काही असलेली कनेक्शन –
24 नोव्हेंबर 1989 – यादिवशी सचिनने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक केलं होतं. पाकिस्तान विरूध्द फैसलाबादमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकं करण्याचा कारनामा त्यानं केला होता.
24 मे 1995 – सचिन याच्या पत्नीचे नाव ‘अंजली तेंडुलकर’ आहे. सचिन व अंजली यांचा 24 मे 1995 साली विवाह झाला . अंजली या एक शिशु रोग तज्ञ आहेत.
24 सप्टेंबर 1999 – सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जन्मदिवस. अर्जुन हा सुध्दा क्रिकेटरच आहे. सचिनला आपण बॅट्समन म्हणून ओळखत असलो तरी त्याचा मुलगा मात्र एक प्रमुख गोलंदाज म्हणून घडतोय. अर्जुन यानं अंडर 19 टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलंय. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होत. केकेआरविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये 16 एप्रिल 2023 रोजी अर्जुन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला आणि अर्जुनचा हा पहिलाच आयपीएल सामना ठरला.
24 वर्षाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारर्कीद : 1989 ते 2013 अशी एकूण 24 वर्षाची त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारर्कीद राहिली. – सचिनने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामने खेळले आहेत.
24 years exact! 15th November, 1989 to 14th November, 2013. #SachinTendulkar #ThankYouSachin pic.twitter.com/a1BycTz35G
— Mumbai Indians (@mipaltan) November 12, 2013
मास्टर ब्लास्टरचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला. त्याचे लग्न 24 मे 1995 ला झालं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 24 सप्टेंबर 1999 ला झाला. याशिवाय त्यानं 24 तारखेला अनेक विक्रम केले आहेत. त्यामुळंच 24 ही सचिनची लकी तारीख ठरली आहे.