मंचर, (प्रतिनिधी) – कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे) यांच्या वतीने ग्रामोन्नती कृषी सन्मान २०२४ घोडेगाव कृषी विभाग आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांना आमदार अतुल बेनके व कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिलतात्या मेहर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे यांनी आत्माअंतर्गत शेतकरी गट नोंदणी, जिल्ह्या अंतर्गत प्रशिक्षण व अभ्यास दौरे, आंतरराज्य, राज्याअंतर्गत प्रशिक्षण व अभ्यास दौरे, शेती शाळा, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन, नावीन्यपूर्ण बाबींमध्ये आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण व महाबळेश्वर येथे अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन यांत्रिकीकरणाद्वारे कांदा लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे आयोजन, आदिवासी भागामध्ये मधुमक्षिकेचे गाव करण्यासाठी पुढाकार,परंपरागत कृषि विकास योजना सेंद्रिय शेती सन २०२२-२३ अंतर्गत १५ शेतकरी गटांचे नोंदणी करून ३०० शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली.
या योजनेअंतर्गत ३०० हेक्टरचे प्रमाणीकरण होणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळाव्याचे आयोजन केले. या कामाची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले.