बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. “दिलबर’ गाण्यापासून ते “गर्मी’ गाण्यापर्यंत तिने आपल्या डान्स आणि आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
तसेच नोरा फतेही ही बेली डान्समध्ये खूपच माहिर आहे. तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडिओ खूपच गाजला होता. ज्यात जी अभिनेत्री श्रद्धा कपूरला “दिलबर’ गाण्यावर बेली डान्स शिकविताना दिसत होती. नोरा फतेहीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ती श्रद्धा कपूरला “दिलबर’ गाण्यातील मेन स्टेप शिकविते. परंतु दिलबर गाण्यातील हुक स्टेप्स न करता श्रद्धा कूपर आणि नोरा फतेही मस्तीत नाचू लागतात.
डान्सच्यावेळी दोघींच्या हालचाली अप्रतिम होत्या, सोबतच मस्ती करताना त्या खूपच क्यूट दिसत होत्या. दरम्यान, नोरा फतेहीच्या अनेक व्हिडिओने सोशल मीडियावर धम्माल केलेली आहे. तिच्या डान्स स्टेप्स् कायम चर्चेचा विषय ठरत असतात.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोरा फतेही “स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये झळकली होती. यात श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय “भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये नोरा फतेहीने निर्णायक भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
Didn’t even notice, no punches left to roll with, U got to keep me focused, U want it? Say so ✨💫 💅🏽👑