#Womenpower ! अमृता फडणवीसांनी शेअर केला हटके लुक

मुंबई – ‘आपल्यातल्या कमतरतांवर मात करून महिला जेव्हा त्यांनाच आपली ताकद बनवतात तेव्हा बलशाली होतात’ अशा आशयाचं ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्वीट केला आहे.

अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांनी  #Womenpower हा हॅशटॅग वापरत फोटो ट्वीट केला आहे.

अमृता फडणवीस यांनी एकून दोन फोटो शेअर केले असून या फोटोत त्यांनी भगवा ड्रेस घातला आहे. तसेच हाय हिल्सही घातल्या आहेत.

या फोटोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी  तुम्ही छान दिसता. तुम्ही स्त्रीशक्तीचा चेहरा आहात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी हाथरस प्रकरणावर तुम्ही गप्प का ? असा प्रश्न विचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.